Breaking News

आळकुटीला दीड लाखाचा ऊस जळाला


अळकुटी /प्रतिनिधी /-पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील शेतकरी अतुल बापूसाहेब माने व नारायण दत्तात्रय माने या दोन शेतकऱ्यांचा सुमारे १ लाख ५० हजारांचा ऊस जळाला असून त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
अळकुटी येथील अळकुटी -पाबळ परिसरातील गट नंबर १३३मधील शेतकरी अतुल बापूसाहेब माने यांचा २ ते ३ महिन्याचा ऊस १ हे. क्षेत्रावरील व यामध्ये असलेले ठिबक सिंचन संचासह जळून गेल्याने त्यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गट नंबर १३३ मधील दत्तात्रय यांचा १ वर्षाचा तोडणीस आलेला ऊस ठिबक संचासह जळून गेला . त्यांचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. वरील दोन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानी चा पंचनामा अळकुटी कामगार तलाठी उंडे यांनी केला. त्यामध्ये अतुल माने यांचे १ लाख व नारायण माने यांचे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.