Breaking News

इस्त्रायल, बॉलिवूड एकत्र येणे मनोरंजन क्षेत्रासाठी अद्भुत ठरेल - मुख्यमंत्री


मनोरंजन क्षेत्रात इस्त्रायल आणि बॉलिवूड एकत्र आल्यास अद्भुत गोष्टी घडविता येऊ शकतील. इस्रायलकडे तंत्रज्ञान आहे, तर आमच्याकडे तारकांचे प्रभावळ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायली चित्रपट आणि तंत्रज्ञान क्षेत्राला निमंत्रण दिले. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनीही बॉलिवूडला इस्रायलमध्ये येण्याचे आवाहन केले.
हॉटेल ताज मध्ये शालोम बॉलिवूड या इस्रायल दूतावासातर्फे आयोजित कार्यक्रमास प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधानमंत्री नेत्यानाहू यांच्या सुविद्य पत्नी सारा नेत्यानाहू यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात निमंत्रित उपस्थितांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, इस्रायलचे राजदूत डॅनियल कारमन, याकूब फिकेलस्टाईन उपस्थित होते.