Breaking News

वाहतुक कोंडीमुळे प्रचंड ञास


कर्जत/प्रतिनिधी/- कर्जत शहराचा मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी होत असुनही पोलीस निरीक्षक वसंत भोये याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहेत.कर्जत शहराचा मुख्य रस्ता आहे या शिवाय याच रस्त्यावर एस.टी बसस्थानक, दादा पाटील महाविद्यालय , महात्मा गांधी विद्यालय , कन्या विद्यालय , तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, सार्वजनीक बांधकाम कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय या शिवाय कर्जतची मुख्य बाजार पेठ आहे. या शिवाय रहदारीचा प्रमुख रस्ता असुनही पोलीस याकडे कानडोळा करतात हे माञ न सुटणारे कोडे आहे?
या रस्त्यावरून दररोज मोठी वाहने, चार चाकी , मोटार सायकली जात आसतात. परिणामी या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी सतत होत असते. या वाहतुक कोंडीमुळे वाहनचालक व नागरीकांमध्ये हमरीतुरी, वादावादी सातत्याने होत असते. या रस्त्यावर सतत वर्दळ असल्यामुळे वाहनांचा गोंधळ, गोंगाटामुळे दुकानदार वैतागले आहेत. या रस्त्यावरील चौका -चौकात सारखी वाहतुक कोंडी होऊन वाहनधारकांमध्ये हाणामा-यांचे प्रमाण वाढले आहे. काँलेज व शाळा सुटल्यावर तर पायी चालणे अत्यंत कठीण होवून बसते. याभागात वाहतुक कोंडी एखादी दुर्घटना घडण्यापुर्वीच पोलीस निरीक्षक भोये व सार्वजनीक बांधकामचे भोसले यांनी हातावर हात घालुन न बसता त्वरीत उपाययोजना करणे आवश्यक आहे.