Breaking News

दफनभूमींचे सुशोभिकरण करा : परजणे


कोेपरगांव : प्रतिनिधी :- येथील स्मशानभुमी, मुस्लीम कब्रस्थान आणि महानूभाव आश्रम दफनभूमीची मोठी दुरावस्थेचे झाली आहे. एक महिन्याच्या आत गावातील सर्व स्मशानभूमी क्रबस्थान, दफनभूमींचे सुशोभिकरण न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणांस बसू, असा इशारा पंचअवतार शेतकरी गटाचे प्रमुख महेश परजणे आणि त्यांच्या सहका-यांनी ग्रामसभेत दिला.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने संवत्सर ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली. त्या सभेत ते बोलत होते. प्रारंभी विधीज्ञ शिरीश लोहकणे यांनी संवत्सर गांव विकास सुधारणेसाठी ग्रामपंचायतीने राबविलेल्या काही उपक्रमांचे स्वागत केले. कोपरगांव तालुका भाजपा अपंग सेलचे अध्यक्ष मुकूंद काळे यांनी ग्रामपंचायतीने २०११ ते २०१७ पर्यंत अपंग विकासनिधीचे वाटप केले नसल्याचा आरोप करीत उपोशणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांना उपोषणापासून परावृत्त केले. या प्रकाराचा मधुकर मैंद व ग्रामस्थांनी निषेध नोंदविला. याप्रसंगी संजीवनीचे संचालक फकिरा बोरनारे, माजी संचालक राजेंद्र भाकरे, माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूराव बारहाते, अनुप शिंदे, गोवर्धन परजणे, राजेंद्र परजणे, विजय काळे, अनिल भाकरे, रामभाऊ कासार, अभिजित बोरनारे, बबनराव बोरनारे, योगेश परजणे, प्रताप परजणे, दत्तात्रय परजणे, अंबादास सोनवणे, कृष्णा वालझाडे, तुषार बारहाते, गुलाब शेख, प्रविण भोसले, सागर निरगुडे, किरण निरगुडे, अभिजित आबक आदी उपस्थित होते.