कोेपरगांव : प्रतिनिधी :- महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्यावतीने दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता राज्य पातळीवरील अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, समाजकल्याण राज्यत्री दिलीप कांबळे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. देवयानी फरांदे आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब सानप आ. सीमा हिरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. नाशिक येथील द्वारका परिसरात असलेल्या डाॅ. भाभा नगरीतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात हे अधिवेशन आहेत. या अधिवेशनात समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. यावेळी समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष एकनाथ बोरसे, सुकाणु समितीचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर व कोपरगांव शहराध्यक्ष सुनील फंड यांनी केले आहे.
परिट धोबी समाजाचे ४ फेब्रुवारी रोजी अधिवेशन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:25
Rating: 5