Breaking News

नाविण्यपूर्ण साहित्यकृती आनंददायी बाब : भास्करगिरी महाराज


नेवासा ता. प्रतिनिधी :- ग्रामीण भागात राहून सामाजिक जाणीव आणि जबादारीचे भान असलेला तरुणाईस बोधप्रध असे ‘पाणमोती’ हा विविध नाविन्यपूर्ण कवितायुक्त काव्यसंग्रह आहे. या भागांत अशी साहित्यकृती आनंददायी अशी बाब आहे, असे प्रतिपादन महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. 
येथील प्रा. इंदुमती दारकुंडे (खंडागळे) लिखित 'पाणमोती' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते देवगड येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांची प्रस्तावना लाभलेली आहे. प्रारंभी शिंगणापूरची विश्वस्त आदिनाथ यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी हभप अतुल महाराज आदमने, प्रकाशक उबेद शेख आदी उपस्थित होते. या काव्यसंग्रहास पंचायत समिती सभापती सुनिता गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे आदींनी शुभेच्छा दिल्या.