श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी :- प्रजासत्ताकदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यां-विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी पथनाट्याद्वारे स्वच्छता अभियानाचे महत्व पटवून देत स्वच्छतेचे संदेश दिले. गणतंत्रदिनाचे औचित्य साधून येथील डी. डी. काचोळे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कर्मवीर चौकसह अनेक ठिकाणी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व सांगितले. पगारे, निकम या शिक्षकानीं यासाठी पुढाकार घेतला. यासाठी मुलामुलींनी आकर्षक असे पांढरे शुभ्र वस्र परिधान केले होते. पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:14
Rating: 5