Breaking News

‘आपले सरकार’ सेवा केंद्र अंतर्गत सर्व सुविधा : मुंढे


नेवासा शहर प्रतिनिधी :- ‘आपले सरकार’ सेवा केंद्र अंतर्गत महाऑनलाइनद्वारे गावपातळीवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे यांनी दिली. येथील सेवा केंद्रचालकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. 
नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेत उपस्थितांना मुंढे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक विठ्ठल आव्हाड, जिल्हा हार्डवेअर इंजिनियर विजय पठारे, विस्तार अधिकारी पाखरे, इंगळे, तालुका समन्वयक असिफ सय्यद उपस्थित होते. यावेळी जिल्हा समन्वयक आव्हाड यांनी ई-ग्रामसॉफ्टमध्ये गाव नंबर, नमुना ८ सह विकासकामांचे आराखडे, मिळकत नोंदणी, नमुना नंबर ८ सह विविध ११ प्रकारच्या गावपातळीवर वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन नोंदीचे डाटा संगणकीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांअंतर्गत देण्यात येणारे दाखले कशाप्रकारे नोंदणी करून लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन तालुका समन्वयक असिफ सय्यद यांनी केले. यावेळी केंद्रचालक विशाल तिवारी, किरण शिंदे, अभिजित निपुंगे, विशाल देव्हारे, राम शिंदे, हर्षदा शेटे, गणेश घोरपडे, सोमनाथ शेळके, मनोज बराडे, राहुल कोळेकर आदींसह केंद्रचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.