Breaking News

नाथ मंदिराला आकर्षक रंगरंगोटी


पैठण प्रतिनिधी :- येथे दि. ७ मार्चपासून सुरू होत असलेल्या संत एकनाथ महाराज यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरातील बाहेरच्या नाथ मंदिर व बाह्य भागातील रंगरंगोटी, लहान मोठी बांधकामे आणि सर्वच कामांना सध्या चांगलाच वेग  आला आहे. नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आ. संदीपान भूमरे व कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने तयारी केली आहे. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयी सुविधा तसेच दर्शनरांगेसाठी गेल्या महिन्यात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. नाथषष्ठी याञेपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आ. भूमरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. मागील आठवडय़ात याठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामांना भेट देऊन आ. भूमरे यांनी पहाणी केली.