Breaking News

बालाजी देडगाव ग्रामपंचायतीत महिलाराज


बालाजी देडगाव / प्रतिनिधी /-- नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या व संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलाराज आले. सरपंचपदी स्वाती चंद्रकांत मुंगसे यांची तर उपसरपंचपदी जिजाबाई लक्ष्मण गोयकर यांची निवड झाली. 
यावेळी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत जिजाबाई गोयकर विरुद्ध अनिकेत मुथ्था यांच्यात लढत होऊन ११ विरुद्ध १ अशा फरकाने जिजाबाई गोयकर यांनी विजय मिळवला. यावेळी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, कुंडलिक मुंगसे, कडूभाऊ तांबे, रामेश्वर गोयकर, भानुदास मुंगसे, चंद्रकांत मुंगसे, दत्ता मुंगसे, लक्ष्मण गोयकर, अविनाश हिवाळे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, सचिन मुंगसे, वेणूबाई तांबे ,अनिकेत मुथ्था, अलका खांडे, सविता हिवाळे , अभिजित ससाणे, शकुंतला मुंगसे, बाळू थोरात, सखाराम गोफणे, केशर पुंड, बाळाजी कोकरे, विठ्ठल भिसे, दशरथ कोकरे, मल्हारी गोफणे, महादेव पुंड, शिवाजी थोरात, सागर मुंगसे, संजय मुंगसे, अशोक तांबे, गणेश खांडे, भालू कोकरे, हरिभाऊ कोकरे, काशिनाथ कोकरे, शंकर गोयकर, धुळाजी भिसे, संदीप रुपनर, शंकर फुलारी, मच्छिंन्द्र कोकरे , पोपट गोयकर, सटवाजी गोयकर, दत्तात्रय मुंगसे, अकबर पठाण, बंडू हिवाळे आदि उपस्थित होते. 

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांचा सरपंच स्वाती मुंगसे यांच्या हस्ते बालाजी सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. पाठक यांनी व सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी एस.एस.शेलार यांनी काम पहिले. -