ज्ञानेश्वर कारखाना सहकाराचा "माईल स्टोन" ठरेल--घुले
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मकर संक्रान्ती निमित्त आयोजित सामुहिक तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना घुले बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,गणेशराव गव्हाणे,जेष्ठ नागरिक गोविंदराव शेळके व्यासपीठावर उपस्थित होते.
घुले पुढे म्हणाले,ज्ञानेश्वर साखर कारखाना हा नेवासा-शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकऱयांचे वैभव आहे.शेतकऱ्यांची 300 कोटी पेक्षाही अधिक प्रॉपर्टी कारखान्याचे रूपाने उभी आहे. ती जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. कष्टाने निर्मिती करणे यासारखे पुण्य नाही. एकदा झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्वानी मिळून 15 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ पूर्ण करून एक नवा उच्चांक प्रस्थापित करूयात. ज्ञानेश्वरच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला वीज जोड देऊ नये साठी काहींनी प्रयत्न करून शेतकऱ्यांचा तळतळाट घेतलेला आहे. राजकारण आता चेष्टेचा विषय बनलेला आहे. सर्वांचे भवितव्य पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे हक्काचे पाणी जतन करण्यासाठी एकसंघ राहण्याची गरज आहे.
संचालक काकासाहेब नरवडे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुखदेव फुलारी, कामगार पतसंस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब लबडे यांचीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालक अनिल हापसे ,अनिल हापसे,राजेंद्र मते,डॉ.सुधाकर लांडे,अशोक वायकर ,कारखान्याचे फायनान्स मॅनेजर अप्पासाहेब खरड, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, डीस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार, सिव्हिल इंजिनिअर रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, अधीक्षक नामदेव पुंड, चिफ अकाऊंटंट भगवान शेंडगे, रामनाथ गरड,श्री.शेंडगे,सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार कारभारी गरड, कृष्णा बरगुजे, भानुदास भोसले, दत्तात्रय चोपडे, नंदकिशोर भालसिंग ,कल्याण गायकवाड, भानुदास कावरे, कामगार संचालक मच्छिंद्र साळुंके ,संभाजी माळवदे, कामगार संघटनेचे सेक्रेटरी जनार्दन कदम, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी , अशोक भुमकर , बाळासाहेब डोहाळे, देविदास पवार, रामभाऊ पाउलबुद्धे, विलास लोखंडे, जनार्दन नेमाणे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, सुरेश ऊगले , सुरेश आरगडे, अप्पासाहेब बोडखे,शोएब शेख, सोमनाथ ओहळे, बाळासाहेब निकम,प्राचार्य दिनकरराव टेकणे, डॉ.बी जे अप्पाराव, मालोजीराव भुसारी, सोपान मते, ज्ञानदेव आरगडे, आदिंसह कामगार उपस्थित होते. सांस्कृतिक मंडळाचे सचिव कृष्णा ऊगले यांनी आभार मानले.
