रत्नागिरी, दि. 31, जानेवारी - लग्नाचे आमिष दाखवून नात्यातील तरुणाने नववीत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुहागर तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली-सडेवाडी येथे ही घटना घडली. आरोपीने मे ते 29 ऑगस्ट 2017 या कालावधीत त्या विद्यार्थिनीच्या राहत्या घरी हे दुष्कृत्य केल्याचे पिडीतेने पोलिसांना सांगितले. पंकज पांडुरंग पाटील (20) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीच्या घराशेजारी राहणारा पंकज पाटील हा विद्यार्थिनीचा नातेवाईक आहे. त्याने त्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून मे 2017 ते 29 ऑगस्ट 2017 या कालावधीत तिच्या राहत्या घरी बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी पंकज पाटील याच्यावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यापर्यंत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर नातेवाईकाचा आत्याचार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:16
Rating: 5