Breaking News

पॅनकार्ड गुंतवणूकदारांचे रत्नागिरीतही आंदोलन

रत्नागिरी, दि. 31, जानेवारी - पॅनकार्ड कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदार आक्रमक झाले असून आज त्यांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. रत्ना गिरीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुंतावणूकदारांनी धरणे आंदोलन केले.

पॅनकार्डमधील 35 लाख गुंतवणूकदारांचा परतावा परत मिळावा यासाठी राष्ट्रशक्ती संघटनेच्या माध्यमातून गुंतवणूकदार संघटित झाले असून राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन क मिटीची स्थापना करण्यात करण्यात आली आहे. पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मिळकती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र सेबीने आपल्या मागण्यांचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीचे म्हणणे आहे. सेबीने घाईगडबडीत मिळकती विक्रीला काढल्या असून त्यांच्या किंमती 50 ते 60 टक्क्यांनी घटवल्या आहेत, ही बाब धक्कादायक असून सरकार याबाबत असंवेदनशील असल्याचे राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज केंद्र सरकार आणि सेबीचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी धरणे आंदोलन केले. जिल्ह्यात पॅनकार्ड क्लबचे सुमारे 90 हजार गुंतवणूकदार आहेत.