नाशिक शहरातील 23 गुंड दोन वर्षांसाठी तडीपार
नाशिक, दि. 20, जानेवारी - नाशिक पोलिसांनी जोरदार कामगिरी केली असून त्यांनी अनेक गुन्हे नावे असलेले आणि नियमित त्रास देत असलेल्या जवळपास 23 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 23 गुंडांना शहरातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. नाशिक शहर परिमंडळ 1 मधील पोलीस स्थानकाच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. आदेश पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढले आहेत.
टोळीप्रमुख समीर विजय यादव (वय 21, रा. रमाबाई आंबेडकर नगर, खडकाळी, भद्रकाली), बालली सदुई गौतम( वय 24, रा. शालीमार कालिदास झोपडपट्टी), हसन वजीर शेख (वय 51, रा. लोणकर मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड नाशिक), सुरेश अर्जुन पवार( वय 40 वर्ष, रा. भारतनगर दर्गा जवळ, वडाळा रोड नाशिक), फारुख शेख गुलाब (वय 38 वर्षे नानवली, जुने नाशिक), सचिन लक्ष्मण मोरे (वय 25 वर्ष, रा. पवन नगर सिडको नाशिक), रवी राजू चव्हाण (वय 26 वर्ष रा. दीपक डोक यांच्या घराजवळ, गंजमाळ भद्रकाली नाशिक), शेख गुलाब महमद अब्दुल रहेमान (वय 62 वर्ष रा. इलायात पार्क बिल्डींगनंबर 8 नागजी हॉस्पिटल समोर), मुक्तार इब्राइम शेख (वय 60, रा. भारतनगर झोपडपट्टी), कमलाकर वामन दोंदे (वय 56 फरीदबाबा मंदिर, पिंपळगाव खांब, तुषार गायकवाड याच्यासह अन्य 12 जणांच्या तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत.
अवैध जुगारी अड्ड्यांवर अनेकदा छापे पोलिसांनी घातले आहेत. यामध्ये टोळीवर विविध असे सात गुन्हे दाखल असून त्यांच्या म्होरक्या असलेला समीर विजय यादव (वय 21, रा. रमाबाई आंबेडकर नगर, खडकाळी, भद्रकाली) आणि त्याच्या टोळीचे 22 सदस्य यांच्यावर असून सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या आगोदर दिले होते आता नवीन आदेशानुसार पुन्हा यांना पकडून त्यांना इतर ठिकाणी दोन वर्षासाठी पाठवले जाणार आहे. या आगोदर या सर्वाना सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते. आदेश 15 जानेवारीला काढण्यात आले आहेत. या बरोबर अजून 51 गुंडांची माहिती पूर्ण केली जात असून त्यांच्या विरोधात सुद्धा लवकरच कारवाई केली जाणार आहे.