राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - यंदाचा 8 वा राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 2018 रोजी साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिन हा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्तरावर साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (इङज) नवीन मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप करणार आहेत. यासाठी काही मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित असणार आहेत. युवा मतदारांसाठी त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार आहेत. ऑनलाईन सहभागासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिला , स्थलांतरित, आदिवासी, बेघर, तृतीयपंथी, तसेच दिव्यांग (अपंग ), निराधार व्यक्ती यांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन केले आहे. त्याशिवाय बीएलओंच्या स्तरावर विशेष कक्ष स्थापन करून मतदारांसाठी नमुना 6,7,8 व 8अ फॉर्म्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.