नाशिकहून आता इतर राज्यातही विमानप्रवास
नाशिक, दि. 25, जानेवारी - राज्यातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचा पहिला टप्प्यांअतर्गत नाशिक पुणे, नाशिक मुंबई सेवा सुरू झाल्यानंतर आता उडाणच्या दुसर्या टप्प्याच्या स्पर्धेत नाशिकचा सामावेश करण्यात आला आहे. यात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ, अहमदाबाद या सहा शहरांना नाशिक जोडले जाणार आहे. याकरीता स्पाईसजेट, इंडीगो, एअर अलायन्स, जेट एअरवेज या कंपन्यांनी सेवा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
‘उडे देश का आम आदमी’ या संकल्पनेतून विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा याकरीता यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी उडाण योजना जाहीर केली होती.या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबई या दोन मार्गांवर एअर डेक्कनकडून महीनाभरापूर्वीच विमानसेवा सुरू झाली. शासनाने नाशिक रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम (उडाण) च्या दुसर्या टप्प्यातून वगळले होते. त्यामुळे पुढील काळातील परिणाम ओळखून प्रसंगावधान राखत खासदार गोडसे यांनी पुन्हा नागरी हवाई मंत्रालयाशी संपर्क साधला.