Breaking News

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला मिळणार उपजिल्हा दर्जा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21, जानेवारी - राज्य सरकारने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अनेक सु विधा उपलब्ध केल्या जातील आणि रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार आहे. या कामाचा प्रारंभ 26 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती खा.विनायक राऊत यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वेंगुर्ले दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते म्हणाले, या निधीतून डॉक्टरांसाठी निवासाची व्यवस्था, पोस्टमार्टम रूम, डायलिसीस सुविधा आदी प्रमुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.