Breaking News

विकासकामांच्या फाईल गहाळ प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणार - अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई, दि. 21, जानेवारी - नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांच्या फाईली गहाळ झाल्याच्या तक्रारी असल्याने या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिली.



या वेळी नामदेव भगत यांनी आमच्या प्रभागांतील विकास कामे होत असल्याचे काही लोकांना आवडत नसल्याने या कामांच्या फाईली हरविल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप केला. पालिकेतून अशा प्रकारे फाईली गहाळ होणे ही खेदाची बाब असून गेल्या 2 वर्षात कोणत्या फाईल चोरी झाल्या व किती फाईल डुप्लीकेेट तयार केल्यात त्याची मा हिती स्थायी समितीत सादर करण्यात यावी, अशी मागणी केली. जानेवारी महिन्यात पास झालेले प्रस्तावाच्या निविदा मंजुरीला येतात व जुलै मध्ये मंजुर झालेला प्रस्ताव निविदा निघत नाही हे योग्य नाही. प्रत्येक महासभेत मंजूर झालेल्या किती प्रस्तांवांच्या निविदा काढण्यात आल्या त्यांची काय स्थिती आहे, याची माहिती देण्यात यावी. ज्या कामांच्या नि विदा झाल्या त्या पैकी तुम्हाला पाहिजे तीच निविदा उघडली जाते असा आरोप सत्ताधारी व प्रशासनावर भगत यांनी केला. शिवसेनेच्या रुचा पाटील म्हणाल्या की, सिताराम मास्तर उद्यानात काम करण्यासाठी खूप पाठपुरावा करून मोठ्या मेहनतीने फाईल तयार झाली आहे. तीन महिने झाले फाईल गायब झाली आहे. फाईलची विचारणा करण्यास गेल्यावर अधिकारी एकमेकांवर ढकलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका छाया म्हात्रे यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन काम करत नसल्याचा आरोप करत, कामे होत नसल्याने मला गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, असा आरोप केला. वॉर्डात कोणाच्या निधनाच्या ठिकाणी गेल्यावर लोक टोचून बोलत असल्याच्या त्या म्हणाल्या. शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांनी मनापाने कामांच्या फाईल ट्रॅकींगचे सॉफ्टवेअर बसवूनही फाईल मिळत नाही, मग ते सॉफ्टवेअर कर्मचार्यांना खेळण्यासाठी बसविले आहे का, असा आरोप केला. या चर्चेला उत्तर देतांना अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण म्हणाले की, फाईल ट्रॅकींगसाठी डीजी एमएस पद्धती सुरू असून सर्व फाईली यात आहेत. गहाळ झालेल्या फाईलीं प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार आहे.