ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही : तनपुरे
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती पत्रकार संजय कुलकर्णी, उपनगराध्यक्षा सुमती सातभाई, संगीता आहेर, अनिल कासार, दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, विजय करपे, गजानन सातभाई आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले, घसरणीला येत असलेले साखरदर आणि तालुक्याच्या क्षेत्रात उभ्या असलेल्या ऊसाच्या गाळपाचे नियोजन यादृष्टीने प्रसाद शुगर सर्व सभासदांनी काळजी करु नये. सर्वांचा ऊस गाळप करणारच आहे. कार्यक्षेत्रातील शेवटचे टिपरु गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही. एप्रिल मे पर्यंत कारखाना सुरुच ठेवणार आहे. आम्ही ऊस उत्पादकांना २ हजार ६०० रुपये दर जाहीर करणार होतो आणि शेवटचे पेमेंट हे २ हजार ८५० पर्यंत देणार होतो. मात्र शासनाच्या आडमुठे धोरणामुळे निर्णय बदलावा लागला. साखरचे दर व बफरस्टॉक तसेच निर्यातधोरण याबाबत शासन उदासिन आहे.
यावेळी वसंत झावरे, सय्यद निसार, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले, प्रभाकर मकासरे, विलास गिर्हे, गणेश हापसे, विनीत धसाळ, रियाज देशमुख, सुनील भुजाडी, संदीप रासकर, विलास कुलकर्णी आदींची भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्ष तनपुरे यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या २०१८ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी सनिल फड़के यांनी प्रास्तविक केले. अप्पासाहेब तनपुरे यांनी सूत्रसंचलन केले.
