राहुरी प्रतिनिधी :- अक्षय नर्सिंग होम व ज्येष्ट नागरीक संघटनेने अवयवदान मोहिमेला नुकताच प्रारंभ केला. या मोहिमेत १४० जणांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला, अशी माहिती डॉ. चंद्रकांत गिरगूणे यांनी दिली. नर्सिंग होम व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने आयोजित मोतीबिंदू शिबिरात त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमनाथ पवार होते. मोतीबिंदू शिबिराचे उदघाटन राजेंद्र भुजाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यात ४० जणांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नेत्रदृष्टी देण्यात आली. मोतीबिंदू शिबिरात एकूण २० हजार रूग्णांनी भाग लाभ घेतला. २ हजार ८०० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रसंगी शिवाजी कोहकडे, भास्कर गाडे, सदाशिव पवार, जाधव गुरूजी आदींनी मनोगत व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशवंत डावखर, भास्कर देशमुख, महादु गोपाळे, विजय भांबरे, रंगनाथ देशमुख, पांडूरंग आघाव, सखाहरी तनपुरे, श्रीकांत मंडलिक, सूर्यकांत कदम यांनी मोलाचे योगदान दिले.
अवयवदान मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:33
Rating: 5