‘स्वाभिमान’चे कृषीप्रदर्शनाच्या ‘टायमिंग’ वर टीकास्त्र
सिंधुदुर्ग, दि. 24, जानेवारी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या ‘टायमिंग’ वर टीकेचे आसूड ओढले आहे. राज्यशासनाच्या कृषीविभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन एक चांगली गोष्ट आहे मात्र हे प्रदर्शन भराडीदेवी यात्रेच्या आधी अथवा नंतर घेतले असते तर योग्य ठरले असते. असे सामंत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक कोणार्क येथील संपर्क कार्यालयात झाली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा अशी ख्याती असलेल्या भराडी देवीच्या यात्रेसाठी मोठया संख्येने भाविक येतात. मोठ्या श्रद्धेने येणार्या भाविकांच्या एकाग्रतेत यामुळे व्यत्यय येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक लहानमोठया व्यावसायिकांचे अर्थकारण या यात्रेवर अवलंबून असते. या यात्रेच्या निमित्ताने वर्षभराची बेगमी करणार्या या सामान्य व्यावसायिकांना मोठा फटका सहन क रावयास लागणार आहे. कृषीप्रदर्शनाचे आयोजन चांगली गोष्ट आहे मात्र यात्रेच्या कालावधीत आयोजित न करता यात्रेच्या पूर्वी अथवा नंतर या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणे योग्य असताना यात व्यत्यय आणण्याचे काम पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी केले आहे. येथे येणार्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गर्दी दाखविण्यासाठी शिवसेनेने हा डाव खेळला आहे. शिवसेनेच्या मनात नेमके काय चालले आहे हा प्रश्न निर्माण होत असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी मालवण येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.