मालवण येथे आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
सिंधुदुर्ग, दि. 24, जानेवारी - ’खएऊडड-’ या तंत्रनिकेतन आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धेअंतर्गत विभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बो र्डिंग ग्राऊंडवर करण्यात आले आहे. या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मालवण शासकीय तंत्रनिकेतनला मिळाला असून यामध्ये इ1 विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, क ोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्यातील अठरा तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, अंतोन फर्नांडिस, अजय शिंदे, रोहित परुळेकर, संदीप पेडणेकर, पप्पू परब, रिझवान शेख उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. वैभव नाईक यांनी खेळाडूंना खिलाडूवृत्ती अंगीकारण्याचे आवाहन केले. आमदार नाईक यांनी प्राचार्य प्रा. डी आर महाजन यांचे विभागीय स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल कौतुक केले व भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सहभागी संघांच्या व्यवस्थापक ांनी स्पर्धेसाठी उत्कृष्ट खेळपट्टी तयार केल्याबद्दल ग्राऊंडसमन पांडुरंग पाताडे, प्रकाश पाताडे, आचरेकर यांचे अभिनंदन केले.
बाबा परब यांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता विशेष सहाय्य केले. बाबा परब व त्यांचे सहकारी शैलेश नामनाईक ,सतीश आचरेकर, अमु हर्डीकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कुडाळकर हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोहित परूळेकर, संदिप पेडणेकर, ज्ञानेश केळुसकर, विल्सन फर्नांडिस हे पंच म्हणून काम पाहत आहेत तर सामान्यांचे समालोचन प्रा. डी एन गोलतकर, प्रा राजेंद्र पेंदाम, नितीन वाळके करीत आहेत.