नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात आणण्याचा शिवसेनेचा घाट - नारायण राणे
मुंबई, दि. 20, जानेवारी - नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेना घालत आहे, असा आरोप करत कोकण वासियांचा -हास होणारा प्रकल्प आणू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
नाणार प्रकल्पाला 18 गावातील जनतेचा, शेतक-यांचा विरोध आहे. पैशासाठी कोकण भस्मसात करायचा शिवसेनेचा डाव आहे. त्या भागात 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. 7 लाख आंब्याची झाडे आणि 3 लाख काजूची झाडे आहेत. आंब्याचे उत्पादन 40 हजार मेट्रिक टन आहे. जगप्रसिद्ध देवगड आंब्याचे क्षेत्र याच भागात येते. सांडपाणी सोडल्यामुळे मासेमारीचेही मोठे नुकसान होईल. राज्यात उद्योग आणि केंद्रात अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रकल्पाला विरोध असेल तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला असा सवालही राणे यांनी केला.