Breaking News

लिव्हरफ्लुक, देवीरोगाने 78 शेळ्यामेंढ्या दगावल्या


सोलापूर, दि. 20, जानेवारी - लिव्हरफ्लुक आणि देवीच्या रोगाने तीन-चार दिवसांत 78 शेळ्यामेंढ्या दगावल्या. उदनवाडी व किडबिसरी येथे या घटना घडल्या. दूषित पाणी पिल्याने लिव्हरफ्लुकचा प्रादुर्भाव झाल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. लिव्हरफ्लुकच्या प्रादुर्भावाने जबड्याखाली सूज आल्याने उदनवाडीतील पाच शेतकर्‍यांच्या 45 मोठ्या, 23 लहान शेळ्यामेेंढ्या दगावल्या. यात कुंडलिक आलदर यांच्या 35 मेंढ्या, 20 कोकरू, बाबासाहेब वलेकर यांच्या दोन शेळ्या, दत्तात्रय यमगर यांच्या चार शेळ्या, एक बोक ड, तीन कोकरू, भीमराव हरिबा सरगर यांची एक शेळी, भीमराव पंडा सरगर यांच्या दोन शेळ्यांचा समावेश आहे. तर देवीरोगाने किडबिसरी येथील शिवाजी बापू कोळेकर यांच्या 10 मेंढ्या दगावल्या. दूषित पाणी पिल्याने शेळ्यामेंढ्यांना लिव्हरफ्लुकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांच्या जबड्याखाली सूज येणे, ताप येणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, यासारखी लक्षणे निदर्शनास आली. त्यामुळे मरण पावल्या. किडबिसरी येथील मेंढ्यांना देवीरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांनी केले.