रायसोनी कॉलेजला अनाधिकृत बांधकामाबद्दल ७० लाखाचा दंड
सन 2014 मध्ये अ.भा. छावा संघटनेच्या वतीने एस.जी.आर. एज्युकेशन संस्थेच्या रायसोनी व साकेश्वर ग्रामीण वि.अनिरुध्द माणिक अडसुळे एज्युकेशन कॉलेजने अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार छावा संघटनेने तहसिलदार यांच्याकडे केली होती. या प्रश्नी छावा संघटनेने महसुल विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय), जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी पाठपुरावा चालू ठेवला होता. रायसोनी कॉलेजला दोन मजली बांधकामाची परवानगी असताना चार मजली बांधकाम करुन, शासनाच्या डोळ्यात धुळफेक केल्याचे संघटनेने शासनाच्या निदर्शनास आनून दिले.
यावर महसुल विभागाने रायसोनी कॉलेजला 70 लाख 68 हजार रुपयांचादंड ठोठावला असून, कॉलजने सदर रक्कम भरली आहे. रायसोनी प्रमाणेच अनाधिकृत बांधकाम करणार्या साकेश्वर ग्रामीण वि.अनिरुध्द माणिक अडसुळे एज्युकेशन कॉलेजवर देखील कारवाई करण्याची मागणीसंघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
