Breaking News

धनगरवाडीच्या उपसरपंच पदी अनिल रकटे


राहाता तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत निवडणूक मागील महिन्यात पार पडली. सरपंच सौ. सीताबाई आदमाने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंच पदाची निवडणूक होऊन या निवडणुकीत जनविकास आघाडीतून सर्वाधिक मताधिक्य घेवून निवडणून आलेले काळे गटाचे अनिल पुंजाजी रकटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रसंगी सदस्य उत्तम रकटे, भाऊसाहेब राशिनकर, सौ. सुमन साखरे, सौ. कलाबाई राशिनकर तसेच चांगदेव लोखंडे, अंजाबापू रकटे, नवनाथ राशिनकर, सौ. अर्चना लोखंडे, भीमाशंकर लोखंडे, पुंजाजी रकटे, नाथाजी रकटे, रामभाऊ करडे,अशोक रकटे, ज्ञानदेव लोखंडे, राजेंद्र लोखंडे, सुभाष साखरे, एकनाथ रकटे, अशोक मडके, भिकाजी साखरे, बाबासाहेब मंडलिक, दत्तात्रय साळुंके, दशरथ करडे, आकाश साठारे, अनिल रकटे, जगन्नाथ राशिनकर, गणेश राशिनकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच अनिल रकटे यांचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे,माजी आमदार अशोकराव काळे, युवा नेते आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्वाना सोबत घेवून युवा नेते आशुतोष काळ व डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगरवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच अनिल रकटे यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून म्हस्के व ग्रामसेवक एस. बी. दिघे यांनी काम पाहिले.