Breaking News

लवकरच मेरी पाथर्डी अब बदल रही है" याची प्रचिती येईल - आमदार मोनिका राजळे

पाथर्डी:(प्रतिनिधी) शहरातील खोलेश्वर मंदिर परिसरात चौदाव्या वित्त आयोगातून हरित पट्टा विकसित करण्यासंदर्भात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा उपवन संरक्षक ए.श्रीलक्ष्मी,जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,माजी जि.प.स.सोमनाथ खेडकर,पंचायत समिती उपसभापती विष्णूपंत अकोलकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्यून जय गर्जे,उपनगराध्यक्ष बजरंग घोडके,पालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके,नगरसेवक रमेश गोरे,प्रसाद आव्हाड,अनिल बोरुडे,नगरसेविका मंगल कोकाटे,सुनीता बुचकूल,काशीबाई गोल्हार,शारदा हंडाळ,गटनेते सुनील ओव्हळ,हिंदकुमार औटी,प्रमोद भांडकर,अजय भंडारी आदी उपस्थित होते. 


यावेळी बोलतांना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की,शहारतील कसबा हा महत्वाचा भाग असून पाथर्डीची ओळख कसबा नावाने होत.पूर्वी निधीची कमतरता भासत होती.मतदार खूप विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून देत असतो.त्याचे मूलभूत प्रश्न सोडवणे हे आपले काम असते.गेल्या तीन वर्षांपासून स्वर्गीय राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून नगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी आणला.यामध्ये खास करून सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या जॉगिंग ट्रॅकचे स्वप्न भाऊंनी पाहिले होते.हे काम आता चालू झाले असून यामध्ये काही किरकोळ अडचणी निर्माण होत आहेत.यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वाना एकत्र घेऊन यातून काही मार्ग काढून हे काम पूर्ण केले पाहिजे. गावासाठी निधी आणाण्यासाठी त्याचा पाठपुरावा करून आपण भांडत असतो. त्याचे कुठेही तरी गांभीर्य लक्ष्यात घेऊन सर्वांनी गावाच्या विकासासाठी जे प्रकल्प राबवत आहोत त्याला नागरीकांनी सहकार्य करावे.यापुढील काळात बस स्टँड,पाणीपुरवठा योजना हे कामे लवकरात लवकर करू. शहरात स्वच्छ भारत अभियानाचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

यामध्ये शहरातील नागरिकांची भूमिका महत्वाची असून स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासून करण्यात यावी.जायकवाडीची पाणी योजना देखील नेहमीच विस्कळीत होत असल्याने नवीन योजनेसाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित केलेला आहे.भविष्यात शहरात कोट्यावधींची विकासकामे आपल्याला करायची असून जिल्ह्यात पाथर्डी नगरपालिका प्रथम कशी आणता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पदाधिकाऱ्यांमधील एकमेकांतील मतभेद टाळून विकासकामात एकी दाखवून द्यावी.तालुक्यात जलयुक्तच्या माध्यमातून सुमारे १५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.त्यामुळे आगामी काळात दुष्काळी पाथर्डी पुसणार आहे.तर नगरसेवक रमेश गोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम केला असून एक समाजासाठी धडपड करणारा माणूस म्हणून ते कौतूकास्पद आहेत.तसेच शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे होणार आहेत त्यामुळे "मेरी पाथर्डी अब बदल रही है" याची प्रचिती येईल असे प्रतिपादन शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले