Breaking News

पिंपरी चौकातील पालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह जळून खाक


पुणे,- पिंपरी चौकामध्ये पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहास आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीत स्वच्छतागृह पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागले हे अद्याप समजू शकले नाही.पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे पालिकेने महिलांसाठी फायबरचे स्वच्छतागृह उभारले आहे. आज सकाळी रस्त्यावरुन जाणा-या काही नागरिकांना स्वच्छतागृहातून धूर आल्याचे दिसून आले. काही वेळातच स्वच्छता गृहाने पेट घेतला. नागरिकांनी पिंपरी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.अग्निशमन दलाच्या जवांनांनी पाणी मारुन आग विझवली असली तरी यामध्ये स्वच्छतागृह पूर्णपणे जळून खाक झाले.