Breaking News

जीएसटी ट्रेनिंग सेंटरचा सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी, - कुडाळ मध्ये वक्रतुंड प्लाझा इथ जीएसटी बी.आर.ट्रेनिंग अकॅडमीच उद्घाटन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उशिरा झाले. या केंद्रामुळे अनेकांना जीएसटी विषयक फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात बदल घडून आणण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतलेआहेत. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे जीएसटी कर प्रणाली. या बद्दल लोकांना प्र शिक्षण देण्यासाठी कुडाळ वक्रतुंड प्लाझा इथे जीएसटी बी.आर.ट्रेनिंग अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. याच उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. यावेळी कोची इथे जीएसटी प्रमुख असलेले नेसन लुईस, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, भाजपचे राजन तेली, मुंबई रिजनल हेड उन्मेष नार्वेकर, चार्टर्ड अकौटंट अमोल खानोलकर, बाबाजी वर्दम उपस्थित होते. 

बी.आर. ट्रेनिंग अ‍ॅकेडमिचे प्रमुख बाबाजी वर्दम यांनी सुरेश प्रभूंचे स्वागत केले. या जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, तसेच यामुळे देशात मोठे बदल होणार आहेत, लोकांना आपण कोणत्या वस्तूवर किती कर भरत आहोत ते या जीएसटी मुळे समजू शकले असे अनेक महत्वाचे मुद्दे सुरेश प्रभू यांनी लोकांना सांगितले.