श्रीमती सुनीता पालवे शब्दगंधच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.
पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/- शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात कार्यरत असणाऱ्या व विविध सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या सुनीता एकनाथ पालवे यांना सन २०१८ चा राज्यस्तरीय शब्दगंध शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगर येथे आयोजित तेराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष मा. भारत ससाणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी शब्दगंध प्रकाशनाचे संस्थापक सुनील गोसावी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे, रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर, आमदार संग्राम जगताप, सुभाष लांडे, बाबा अरगडे, शिक्षक नेते संजय कळमकर, डॉ अशोक कानडे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अँड सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, ग्रंथपाल किरण गुलदगड आदींनी श्रीमती सुनीता पालवे यांचे अभिनंदन केले.