Breaking News

जे सुचेल ते लिहित चला - प्राचार्य डॉ जी पी ढाकणे.


पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/-आपल्या मनात जे सुविचार येतात ते लिहित चला, वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन व लेखन संस्कृती लोप पावत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे लेखन व वाचन कौशल्य वृद्धिंगत होईल तसेच वाचनाने माणसाचा सर्वांगीन विकास होतो व त्यातूनच लिखाणाचे कौशल्य निर्माण होत असते असे वक्तव्य प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे नी व्यक्त केले.

शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात प्रजासत्ताकदिन निमित्त कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाने घोषवाक्य व भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे बोलत होते. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा शेखर ससाणे, ग्रंथालय प्रमुख प्रा किरण गुलदगड, प्रा रमेश मोरगावकर, प्रा दीपक पावसे, प्रा देवेंद्र कराड, प्रा आशा पालवे, प्रा सुरेखा चेमटे उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये प्राजक्ता जायभाये, प्रतीक्षा काटकर, मयुरी थोरात, योगेश राठोड, रोहित गाडे, पल्लवी थोरे, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पर्यावरण, प्रदूषण, स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक विषयासंदर्भात जनजागृती निर्माण करणारे घोषवाक्य, व भित्तीपत्रक यावेळी सादर केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा आशा पालवे यांनी मानले.