Breaking News

वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पदभरतीसाठी पडताळणी प्रक्रिया सुरू

नाशिक, दि. 18, जानेवारी - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बी.ए.एम.एस. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संभाव्य उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 24 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृह (नवीन) येथे होईल. उमेदवारांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध क रण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, देवळा व चांदवड या तालुक्यातील 50 उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकार्‍याची कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवर्गानुसार खुला प्रवर्गाच्या 24 पदांसाठी 36 , ओबीसी 10 पदांसाठी 15, एससी 6 पदांसाठी 9, एसटी 3 पदांसाठी 6 , व्हीजे ए 2 पदांसाठी 4, एनटी बी 1 पदासाठी 3, एनटी डी 1 पदासाठी 3, एनटी सी 2 पदासाठी 4 आणि एसबीसी 1 पदासाठी 3 उमेदवारांनी उपस्थित राहण्याविषयी सुचना व यादी संकेतस्थळवार देण्यात आली आहे. अर्ज केलेल्या 765 पैकी 639 उमेदवार संभाव्य निवडीसाठी पात्र ठरले आहेत.


यापूर्वी सदर पदांसाठी पात्र यादीवरील आक्षेपांचा खुलासा 6 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. तसेच 7 व 8 डिसेंबर 2017 रोजी मुलाखती घेण्यात येणार्‍या मुलाखती रद्द करण्यात आल्या होत्या, असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांनी कळविले आहे.