भातकुडगाव हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा संपन्न
या स्पर्धेत 5 वी ते 8 वी इयत्ते पर्यंतच्या जवळपास 100 विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. निबंध स्पर्धेसाठी वृक्षारोपण काळाची गरज, यात 8 वी बची विद्यार्थीनी अमृता वडणे प्रथम, 7वी बची विद्यार्थीनी पल्लवी नजन द्वितीय, तर 8वी ब ची विद्यार्थीनी वैशाली नजन हीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच चित्र रंगभरण स्पर्धेत शाळेत जाणारी मुले या रंगभरणात 8वी ब विद्यार्थीनी पल्लवी जमधडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर याच विषयात 7वी अ ची विद्यार्थीनी करिश्मा शेख हिने तृतीय क्रमांक मिळविला. वृक्षारोपण करणारी मुले या रंगभरणात 6वी अ विद्यार्थी जाॅनसन साळवे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विजेत्या स्पर्धकांना निबंध व रंगभरण या दोन्ही गटाला सरपंच सर्जेराव नजन जि. प. सदस्य रामभाऊ साळवे जोहरापुर सरपंच अशोक देवढे देवटाकळी माजी सरपंच अशोक मेरड युवा नेते अजय नजन व भातकुडगाव येथील राजमुद्रा क्रिडा मंडळाच्या वतीने रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धा बक्षीस वितरण येत्या 26 जानेवारीला स्वातंत्र्यदिनी विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री त्र्यंबक जाधव व शिक्षकांनी सहकार्य केले.
