मराठवाड्यातील दुष्काळावरील उपाययोजनांसाठी इस्त्रायलच्या मेकोरोट कंपनीसोबत सामंजस्य करार
सतत उद्भवणार्या पाणी टंचाईमुळे 2016 च्या उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याला 4000 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. याशिवाय तात्पुरत्या पाणी पुरवठा उपाययोजना हाती घ्यावा लागल्या होत्या. तसेच लातूर शहराला 300 किमीवर असलेल्या मिरज येथून रेल्वेद्वारे पाणी पुरवण्यात आले होते. या दुष्काळी परिस्थितीवर खात्रीशीर व कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून ग्रामीण तसेच शहरी भागाला पाणी पुरवठा करण्याच्या कायमस्वरुपी उपाययोजनांचा आराखडा आखण्यात येत आहे.
