मुंबई शहरातील नागरी योजनांसाठी 116 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
मुंबई, दि. 18, जानेवारी - मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना 2018-19 या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 96 कोटी 47 लाख, अनुसूचित जाती उपयोजना 18 कोटी 76 लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना 1 कोटी 58 लाख असे एकूण 116 कोटी 81 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.
मुंबई शहराची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात पार पडली. या सर्वसाधारण योजनेअंतर्गत गाभा क्षेत्रांतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी 99 लाख रूपये, सामाजिक व सामुहिक सेवांसाठी 89 कोटी 25 लाख 63 हजार रूपये, बिगर गाभा क्षेत्राअंतर्गत उद्योग व खाणसाठी 17 लाख रूपये, सामान्य सेवांसाठी 6 कोटी 04 लाख 37 हजार रूपये, सामान्य आर्थिक सेवांसाठी एक लाख रूपये आदी तरतूदींचा समावेश आहे.