राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत भार्गवी संखेने पटकाविले सुवर्ण पदक
पालघर, दि. 18, जानेवारी - पालघर जिल्ह्यातील वसई येथील राहुल इंटरनेशनल स्कूल मध्ये शिकत असलेली भार्गवी प्रशांत संखे हिने 14 वर्षे खालील वयोगटात सुवर्ण पदक मिळवले आहे. स्कूल गेम ऑफ फेडरेशन आयोजीत 63 वी राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धा 2018, तेलंगणा येथील संगारेड्डी येथे 9 ते 13 जानेवारी 2018 दरम्यान पार पडली. सदर स्पर्धेत देशाच्या कानाकोपर्यातून 24 राज्याच्या संघाणी सहभाग घेतला होता. वसई ची सुकन्या भार्गवी प्रशांत संखे राहुल इंटरनेशनल स्कूल हिने सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करीत 14 खालील वयोगटात सुवर्ण पदक मिळवले. कराटे मधील आपले सातत्य कायम राखत सलग 4 वर्ष महाराष्ट्राला पदके मिळवून देणारी भार्गवी ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे.मागील कित्येक वर्ष्यापासून सातत्य पूर्ण कामगिरी करीत असलेल्या भार्गवीने कठोर परिश्रम व मेहनत घेतली आहे.
यावेळी भार्गवी ने आपले मत व्यक्त करीत म्हटले आहे की, मला प्रशिक्षक सेन्सई सीताराम चव्हाण, सेन्सई सूर्यप्रकाश मुंडापाट यांनी घेतलेले श्रम व आई वडिलांचे पाठबळ या व्यतिरिक्त वसई विरार शहर क्रीडामंडळ तसेच या सर्वांना व पहाडा सारखे पाठीमागे उभे असलेले लोक नेते व आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षीतिज ठाकूर, हेच मला सतत स्फु र्तीस्थान व माझ्या यशामागचे गमक असल्याचे मला अभिमान आहे असे सांगितले. देशाचे प्रतिनिधित्व करीत आपल्या देशासाठी आपले योगदान देण्याचे मनाशी ठाम धरून बसलेल्या भार्गवी हिला वसई विरार शहर महापौर रुपेश जाधव व उपमहापौर प्रकाश रोड्रिक्स यांनी शुभेच्छा देत भार्गवी सारख्या सुवर्णकन्येस वसई विरार शहर मनपा तसेच समस्त जनता नेहमीच पाठबळ देत राहील, असे सांगितले. भार्गवीच्या या यशाबद्दल वसई विरारच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातुन स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे.