Breaking News

दुचाकी अडविणार्‍या वाहतूक पोलिसालाच उडवले


मुंबई : जे. जे. उड्डाणपुलावरुन एका दुचाकीस्वाराने कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक पोलिसाला उडविल्याची घटना घडली आहे. जे.जे. उड्डाण पुलावर दुचाकीला परवानगी नसतांनाही आनंद सिंग हा येथून भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. त्यांमुळे त्याला अडविण्यासाठी गेलेले वाहतूक पोलीस उत्तम म्हस्के यांना दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या घटनेत वाहतूक पोलीस उत्तम म्हस्के गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.