पहिल्या युवती क्रिकेट क्लबच्या मुलींची घोडदौड सुरू
सोलापूर, दि. 01 - जिद्द्चिकाटी आणि क्रिकेट खेळण्याचे वेड असणा-या रागिनी वुमेन्स क्लबच्या मुलींनी विशेष सुविधा नसतानाही मुली क्रिकेट जगतातही उत्तम काम करू शकतात हे उदाहरण महाराष्ट्राला दाखवुन देत आहेत. सकाळ संध्याकाळ आपल्या कष्टाला पर्याय न देता या कन्या प्रामणिकपणे मैदानावर कष्ट करत आहेत. त्यांची जिल्हा स्तरीय संघात निवड झाली असुन त्या आता राज्याच्या संघासाठी सज्ज झाल्या आहेत.
त्यांच्या या निवडीने अनघा देशपांडे नंतर पुन्हा एकदा सोलापूरचे नाव महिलांच्या क्रिकेट जगतात गाजेल अशी अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. मात्र या मैदानावर खेळणा-या मुली म्हणतात की आम्हाला अनघा देशपांडे ताई आणि सोलापूरच्या प्रार्थनाताई सारखे व्हायचे आहे. त्यामुळे उरी ध्येय बाळगुन काम करणा-या या कन्या एका वर्षातच प्रचंड वेगाने पुढे जात आहेत.
दोन मुलींच्या या क्लबने गेल्या उन्हाळयात आपल्या कामाला सुरूवात केली. संचालक संघटक मल्लीनाथ याळगी यांना यावेळी लोक म्हणत की मुली कुठे खेळणार काय तरी प्रयत्न करताय तुम्ही त्यापेक्षा मुलांच्यासाठी वेगळा खेळ सुरू करा मात्र त्यांनी आपली हारी मानली नाही. त्यांनी एक एक करत 22 मुलींची टीम जमा केली. ती लगानचीच टीम म्हणा हव तर कारण तेव्हा कुणालाही खेळ सराव आणि नियम माहिती नव्हते त्यावेळी याळगी यांनी आपला संपुर्ण वेळ या खेळाडुंना दिला त्यांच्याकडुन उत्तम सराव करून घेतला. संपुर्ण वर्षभर सराव करणा-या या कन्यांनी आपल्या संघातील अनेक खेळाडुंनी राज्याच्या संघात स्थान मिळवायचेच असा चंग बांधुन दि 25 मे रोजी सोलापूरच्या पार्क चौक येथे खेळ केला.