संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभिन्न स्पर्धांचे आयोजन
या अभियान अतर्गत स्वच्छ आंगण, स्वच्छ घर, उत्क्रुष्ट पिण्याचे पाणी साठवण करणारे कुटुंब, स्वच्छ जनावरांचा गोठा, स्वच्छ गल्ली, स्वच्छ वस्ती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महिलांच्या गाणी स्पर्धा, शालेय विद्यार्थी यांची " माझे स्वप्नातील स्वच्छ व सुंदर गाव या विषयावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, हात धुवा प्रात्यक्षिक व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करणायात आले होते. यामध्ये अनगरे गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. विजेते स्पर्धकांना ग्रामपंचायत च्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत चे सरपंच ज्ञानेश्वर दत्तात्रय परकाळे , उपसरपंच सचिन शांतीलाल घोलप , सदस्य जालींदर घोलप, नंदा घोलप , राजश्री ईथापे, जयश्री परदेशी, राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक अमीर शेख, व्हाईस चेअरमन नामदेव घोलप, युवराज इथापे , सुभाष परदेशी , सुदाम घोलप, सुभाष घोलप, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वसंत घोलप, पोलीस पाटील बापुसाहेब परकाळे, जि प प्रा शाळा अनगरे मुख्याध्यापक श्रीमती म्हस्के, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा थोरात ,आशा सेविका सुषमा जोगदंड , ग्रामपंचायत कर्मचारी राहुल पोळ, काळुराम जोगदंड यांनी विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
