Breaking News

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील विविध शाळा, विद्यालये, शासकीय कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली.भांबोरा येथील श्री.सिद्धेश्वर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक बाळासाहेब घोरपडे होते. कार्यक्रमासाठी दिलीप कसबे, गोविंद लोखंडे, उर्मिला शिर्के,स्वाती गावडे, वैशाली अनारसे, सुवर्णा फुले आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकत भाषणे केली. सतीश पंडित यांनी सुत्रसंचलन केले. जालिंदर सोनवणे यांनी आभार मानले. खेडचे परिवर्तन इंटरनॅशनल स्कुल,प्राथमिक शाळा येथेही जयंती साजरी झाली.