Breaking News

जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत गायत्री बारगजे ,श्रावणी बारगजे यांना सुवर्णपदके


जामखेड /ता.प्रतिनिधी/- चला खेळूयाच्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत येथील गायत्री बारगजे व श्रावणी बारगजे यांनी सुवर्णपदके जिंकली. नाशिक विभागीय महसूल विभागा अंतर्गत राबविण्यात आलेल्या 'चला खेळूया' या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक विद्यालयात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या
( लोकमान्य) गायत्री बारगजे व श्रावणी बारगजे यांनी सुवर्णपदक जिंकून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. याच शाळेतील आदित्य जायभाय व ओम बारगजे यांनी रौप्यपदके पटकावली. कन्या विद्यालय जामखेड या शाळेतील 

माधवी आढाव, तनिष्का डाडर यांना रौप्य व यशोदा बेरडला कांस्यपदक तर नागेश विद्यालयाच्या संकेत भालेरावने कांस्यपदक जिंकले. या खेळाडूंना लोकमान्य शाळेच्या मुख्याध्यापिका मीना राळेभात कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम. एस. मेढे नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक संपतराव काळे, क्रीडाशिक्षक बी.के.मडके, सुरज डाडर व जीन सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वरील सर्व खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे, अलताफ कडकाले, किरण बांगर, संजय बेरड, दत्तात्रय उदारे यांनी अभिनंदन केले.