Breaking News

बँक ग्राहकांचे नुकसान टाळण्यासाठी सायबर साक्षरता आवश्यक

रत्नागिरी, दि. 25, जानेवारी - आजच्या आधुनिक काळात इंटरनेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असून आर्थिक व्यवहारदेखील ऑनलाइन होतात. या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगून व्यवहार केले असता हे व्यवहार सुरक्षित आहेत. त्यासाठी बँक ग्राहकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी सायबर साक्षर व्हावे, असे सायबर शाखेचे पोलिस  निरीक्षक शिरीष रासने यांनी सांगितले.


सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी पोलीस व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या अंतर्गत सायबर सुरक्षा या विषयावर अ धिकारी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर शाखेत करण्यात आले त्यावेळी श्री. सासणे बोलत होते. 

एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माहितीच्या आधारे घडणार्‍या सायबर गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या बँक व्यवहाराची तसेच आपल्या पासवर्डची मा हिती कोठेही शेअर न करता गोपनीय ठेवावी. आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक क रण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विश्‍वास न बसणार्‍या जाहिरातींना बळी न पडता डिजिटल व्यवहारात होणार्‍या व्यवहाराची चौकशी व शहानिशा करूनच व्यवहार करावेत, असेही यावेळी श्री. सासणे यांनी सांगितले.


सायबर तज्ज्ञ मुकुल नेरूळकर यांनी सांगितले की सायबर गुन्हेगार हे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा उपयोग आर्थिक तसेच वैयक्तिक नुकसानीसाठी करत असतात. आपली वैय क्तिक माहिती इंटरनेट तसेच हॉटेल, ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर देताना संबंधित संकेतस्थळ अथवा प अधिकृत असल्याची खात्री केल्यानंतर व्यवहार करावेत, असा सल्लाही श्री. नेरुळकर यांनी दिला.