शिर्डी परिषदेने ओबीसी सलोखा सौहार्द धोक्यात आ. राठोड यांनी संघाची दलाली करू नये : अशोक सोनवणे
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ;- उपेक्षितांच्या अन्यायाचे भांडवल करून जातीय तेढ निर्माण करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुप्त इच्छा पुर्ण करण्याची दलाली आ. हरिभाऊ राठोड यांनी करू नये. अन्यथा ओबीसी समाज कथित पुढार्यांना महाराष्ट्रात पळता भुई थोडी करेल. असा गर्भित इशारा ओबीसी चळवळीचे अभ्यासक आणि राष्ट्रीय क्रांतीसूर्य ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी दिला आहे. शिर्डी येथे 27 जानेवारी रोजी आयोजित ओबीसी परिषदेच्या पार्श्वभूमीवर आ. हरिभाऊ राठोड यांच्या संघपुरक भुमिकेवर अशोक सोनवणे बोलत होते.
स्वातंत्र्य पुर्व काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील उपेक्षित घटकांचा बुध्दी भेद करून समाज व्यवस्थेची घडी उस्तरणारा छुपा अजेंडा राबवित आहे. त्या अजेंड्याला समाजमान्यता मिळावी म्हणून उपेक्षित, मागासवर्गीय, पिछड्या जातीतील काही तत्वहीन बीनबुडाच्या पुढार्यांना हाताशी धरण्याची चाल संघ तेंव्हापासून खेळत आहे.
केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून संघाचा हा अजेंडा उघडपणे राबविण्यासाठी सत्ता केंद्राचा वापर होत आहे. सत्तेच्या छायेखाली समाजातील विचारांचे अधिष्ठान नसलेल्या नेत्यांना अमिषे दाखवून खेचले जात आहे. संघाच्या छायेखाली आलेल्या या नेत्यांच्या खांद्यावर छुप्या अजेंड्याचे ओझे ठेवून संघ विचारसरणी त्यांना अपेक्षित व्यवस्था निर्माण करीत आहे. शिर्डी येथे शनिवार दि.27 जानेवारी रोजी होत असलेली ओबीसी परिषद या छुप्या अजेंडाचीच परिणीती आहे. आणि या परिषदेचे प्रमुख निमंत्रक आ. हरिभाऊ राठोड हे संघ सत्तेच्या प्रभावाखाली आलेले विचारांचे अधिष्ठान नसलेले भटक्या विमुक्तांचे कथित पुढारी आहेत. संघाला जे हवे आहे ते राठोड यांच्या माध्यमातून पुर्ण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन आहे. त्याला आ. राठोड यांचे वक्तव्य दुजोरा देते.
आ. राठोड म्हणतात की, ओबीसींची वर्गवारी करण्याचे आश्वासन सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहे. राठोड यांच्या या वक्तव्यानंतर शिर्डीच्या या परिषदेचे आयोजन कुणाच्या आणि कोणत्या हेतूसाठी आहे, हे स्पष्ट होते. असा आक्षेप नोंदवून अशोक सोनवणे यांनी ओबीसीमध्ये गट तटाचे विष न पेरण्याचे षडयंत्र महागात पडेल असा इशारा आ. राठोड यांना दिला आहे.अशोक सोनवणे पुढे म्हणाले की, गावगाड्याच्या कारभारात, पंचक्रोशीच्या विकासात ओबीसी प्रवर्गातील विविध जात घटकांमध्ये असलेला सलोखा मोलाचे योगदान देत आहे. या जातीघटकांमध्ये कुठल्याही कारणांमुळे तेढ निर्माण झाली तर या सलोख्याची शिलई उधडण्यास वेळ लागणार नाही. संघाला तेच हवे आहे म्हणून आ. हरिभाऊ राठोड यांनी संघाचे दलाल बनून सामाजिक सलोखा उधडण्याचे पाप करू नये अन्यथा हा समाज आपल्यासारख्या स्वार्थी नेत्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
राठोडांची मनोभुमिका विघटनवादीमागील वर्षी मराठा आणि बहुजन समाजाने आपल्या अस्मितेचे प्रदर्शन करतांना न भुतो न भविष्यती संघटन दाखविले होते. ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे निघूनही बहुजन समाजाचे सख्य निर्बाधीत राहिले. राठोड यांच्या सारख्या अल्पसंतुष्ट नेत्यांनी या मोर्चांदरम्यान ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन या सख्याला दिलेले आव्हानही कुचकामी ठरले. थोडक्यात तेंव्हाही या मंडळींची मनोभुमिका विघटनवादी असल्याची टिका होत होती. तिच मंडळी या परिषदेचे आयोजन करीत असल्याने त्यांच्या मनोभुमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
चळवळींच्या बालेकिल्ल्यात ओबींसीमध्ये गटतट पाडण्याचे षडयंत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीसाठी स्वतंत्र आयोगाची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी तत्कालीन नेते सरदार वल्लभभाई पटेल यांनी फेटाळून लावली होती. त्यांनतर नेमलेल्या काका कालेलकर, मंडल आयोगांनतर देखील, ओबीसी समाजातील न्याय हक्क प्रलंबित आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजपर्यंत ओबीसींची जनगणना झालेली नाही. चळवळींचा बालेकिल्ला, शिर्डीच्या साईबाबांच्या पवित्र भूमीत आ. हरिभाऊ राठोड यांनी ओबीसीमध्ये गटतट पाडण्याचे षडयंत्र करू नये. ओबीसी समाजाची जनगणना जोपर्यंत हो नाही, तोपर्यंत, ओबीसीमध्ये गट तट पाडण्याचे षडयंत्र राठोड यांनी कय नये, असा इशारा अशोक सोनवणे यांनी दिला आहे.