पुणे, दि. 18, जानेवारी - बसथांब्यावर थांबलेल्या तरुणावर ब्लेडने वार करून दोन सराईत गुन्हेगारांनी त्याच्याकडील सोळा हजार रुपयांची रोकड लुटुन नेली. नागरिकांनी तत्परता दाखवत या सराईत गुन्हेगारांना पकडून सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सिंहगड रस्त्यावरील फनटाईम सिनेमाच्या समोर घडली.शुभम रमेश लोंढे (19, रा. दांडेकर पूल) आणि राकेश परशुराम पोसोटे (24, रा. जयभवानीनगर, पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तेजस हरसुरे ( 18, रा. वडगांव धायरी) यांनी यासंदर्भात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस हा फनटाईम सिनेमाच्या समोरील बसथांब्यावर थांबला होता. त्यावेळी लोंढे आणि पोसोटे हे तेथे आले. त्यांनी तेजस याच्याकडील सोळा हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली. त्याने आरडाओरडा केला असता नागरिकांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक महागंडे अधिक तपास करत आहेत.
तरुणावर ब्लेडने वार करून लुटणार्या दोघांना अटक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
19:30
Rating: 5