पालघर, दि. 18, जानेवारी - डहाणूतील चिखले येथील वंदेश रतीलाल आगरी (44) याची पणा पागी आणि रोहन दुबळा या बावीस वर्षीय युवकांनी अवघ्या बारा हजार रू पयांसाठी दगड़ाने ठेचुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत वंदेश आगरी हा मच्छीमार व्यावसायिकांना खलाशी पुरवणारा ठेकेदार होता. मृत वंदेश ने आरोपींना 12 हजार रुपये आगाऊ दिले मात्र त्यांनी काही दिवसांनी बोटीवर जाण्यास नकार दिला.त्यामुळे वंदेश ने त्यांच्या मागे पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे आरोपींनी सु नियोजित डाव आखून वंदेश ची दगड़ाने ठेचुन हत्या केली . हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करून हा अपघात भासावा म्हणून आरोपींनी मृतदेह घटनास्थळापासून 100 मिटरवर 136/1 रेल्वे रुळावर फेकून दिला. मात्र हा घातपाताचा डाव असल्याचे सांगून वंदेश च्या कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात घोलवड पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल असून अधिक तपास सुरु आहे.
अवघ्या 12 हजार रूपयांसाठी दगड़ाने ठेचुन हत्या
Reviewed by Dainik Lokmanthan
on
19:46
Rating: 5