Breaking News

दौंडमध्ये पोलिसांचा गावठी दारू अड्यावर छापा


पुणे,  जिल्ह्यात बिनदिक्कतपणे गावठी दारू अवैधपणे विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. दौंड तालुक्यातील नांदूर गावच्या हद्दीत असलेल्या बोराटे वस्तीजवळील गावठी दारू अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 1 लाख 23 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अक्षय गुडदावत (रा.गाडामोडी, खामगाव, ता. दौड, जि. पुणे) यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर गावच्या हद्दीत तळ्याजवळ गावठी दारू अड्डा सुरू असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस नाईक गजानन खत्री, मंगेश कदम, हरिष शितोळे यांच्या पथकाने अचानक दारू अड्यावर छापा टाकला.या छाप्यात गावठी दारू करण्यासाठी लागणारे 175 लिटर रसायन, दारू तयार करण्याची साधने असा एकूण 1 लाख 23 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी पोलिसांना पाहताच आरोपीने पोबारा गेला. पोलिसांनी आरोपी अक्षय गुडदावत विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार के. डी. मोहिते करीत आहेत.