Breaking News

पोलिसाने जीवावर उदार होवून आवळल्या बिबट्याच्या मुसक्या


मुंबई :- निजामपूर परिसरातील जामकी शिवारात एका पोलीस कर्मचा-याने जीवावर उदार होवून बिबट्याच्या मुसक्या आवळल्या. विनोद पाठक असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. येथील भागात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे पथक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाच्या पथकासह पोलीस दलातील जवानांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी निजामपूर पोलीस ठाण्यातील विनोद पाठक यांनी जीवावर उदार होत त्या बिबट्यावर झडप घातली. त्यांनी बिबट्याच्या अंगावर झोकून देत बिबट्याला दाबून धरले. या झटापटीत त्यांना किरकोळ जखमही झाली. मात्र, त्यांनी बिबट्यावरील आपली पकड ढिली होऊ न देता त्याला हाताने दाबून धरले. बिबट्याने सुटका करण्यासाठी जीवाचा आकांत केला. मात्र, विनोद यांच्या मगरमिठीतून सुटका करणे बिबट्याला शक्य झाले नाही. त्यानंतर इतरांनी विनोद यांच्याकडे धाव घेत बिबट्याला पकडून जेरबंद केले.