Breaking News

आयुर्वेदाचे महत्व जागतिक स्तरावर - श्रीपाद नाईक


पुणे :-  आयुर्वेद, योग, युनानी, होमियोपथी, सिद्ध या वैद्यकीय चिकित्सा प्रणालीच्या माधमातून राष्ट्रीय स्वास्थ्य कसे जोपासले जाईल याचे धोरण भारत सरक ार राबवित आहे. लोकांना परवडतील असे औषधोपचार देण्यामागे आयुष मंत्रालय भर देत आहे. यावरून आयुर्वेदाचे महत्व जागतिक स्तरावर प्रामुख्याने दिसत आहे. स्वास्थ्य रक्षणासाठी आयुष कार्यरत आहे, असे मत आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज 14 जानेवारी रोजी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. या वेळी नाईक म्हणाले एवढ्या मोठ्या संख्येने देश - विदेशातून या परिषदेसाठी अनेक जण सहभागी झाले आहेत. यातूनच आयुर्वेदाचे महत्त्व कळते. परिसंवादातून समाजामध्ये आयुर्वेदाच्या उपयोगातून स्वास्थ्य निर्मिती व्हावी आणि त्याचा अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा हा उद्देश असून कुपोषणासारख्या समस्यांवर देखील काम व्हावे. प्रत्येक देशाची पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा आहे त्यामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका हे देश अग्रेसर आहेत. आयुर्वेदीय पारंपरिक वैद्यकीय चिकित्सेच्या मदतीने स्थानिक औषधी वनस्पतीची लागवड व संरक्षण होणे महत्वाचे आहे. भारतामध्ये पारंपरिक चिकित्सेने लोकांचे स्वास्थ्य निर्माण व्हावे या हेतूने भारत सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली. आयुर्वेद, योग, युनानी, होमियोपथी, सिद्ध या वैद्यकीय चिकित्सा प्रणाली यामध्ये असून त्यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वास्थ्य कसे जोपासले जाईल याचे धोरण भारत सरकार राबवित आहे आणि यशस्वी देखील होत आहे. लोकांना परवडतील असे औषधोपचार देण्यामागे आयुष मंत्रालय भर देत आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन तर धन्वंतरी जयंती राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा साजरा केला यावरून आयुर्वेदाचे महत्व जागतिक स्तरावर प्रामुख्याने दिसत आहे. स्वास्थ्य रक्षणासाठी आयुष कार्यरत आहे असे मत नाईक यांनी व्यक्त केले.