Breaking News

भिमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - खा. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 07, जानेवारी - भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.


आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झालाय. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करित नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मुकसंमतीने जाणिवपूर्वक हे सुरु आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.