Breaking News

कांजुरमार्गमधील सिने विस्ता स्टुडिओला आग


मुंबई, दि. 07, जानेवारी - कांजुरमार्गमधील सिने विस्ता या स्टुडिओला आज सायंकाळी मोठी आग लागली. बेपनाह मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना ही आग लागली. या वेळी सुमारे 150 लोक आतमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी 6 अग्नीशमन गाड्या दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते.